आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये भव्य तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये भव्य तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा


पनवेल(प्रतिनिधी) पनवेलमधील जाणीव एक सामाजिक संस्था व रायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 7) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील व रायगड तायक्वांडो असोसिएशन यांच्यातर्फे ही एक दिवसीय स्पर्धा शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत 500हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, अजय बहिरा, प्रदीप सावंत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, निता माळी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, रायगड जिल्हा तायक्वांडोचे असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद निंबरे, सरचिटणीस सुभाष पाटील, खजिनदार प्रभाकर भोईर, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, प्राचार्य आनंद, महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, सांस्कृतिक सेल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, अरुण सोळंकी, आदिती मराठे, लीना पाटील, स्नेहल खरे, चंद्रकांत पाटील, उमेश इनामदार, प्रसाद हनुमंते, प्रसाद म्हात्रे, मनोज पाटील, रुपेश नागवेकर, प्रवीण काणे, महेश सरदेसाई, शैलेश कदम, राहुल सावंत, प्रसाद कंदारे आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

या वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक पटक विजेत्या प्राजक्ता अंकोलेकर, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेते शुभम पोवार, जपानमधील स्पर्धेत सुवर्णपदक विजेते पुनीत पाटील, कोरियातील स्पर्धेत सुवर्णपदक विजेते ओंकार भगत यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image