जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” रोहा येथे संपन्न

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” रोहा येथे संपन्न

 

     *अलिबाग, दि.08 (जिमाका):-* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त या आर्थिक वर्षातील पहिला “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” काल (दि.07 जून) रोजी रोहा एमआयडीसी मधील रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन हॉल येथे पार पडला.

     या मेळाव्यासाठी रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री.डी.जी.नांदगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर रोहा, पुणे, तळोजा येथील एकूण 09 उद्योजक व त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

     या रोजगार मेळाव्यात 249 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. यापैकी 94 उमेदवारांची प्राथमिक यादीत निवड झाली तर 10 उमेदवारांची निवड अंतिम यादीत करण्यात आली. या मेळाव्यास रोजगार इच्छुक उमेदवारांचा तसेच उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.



Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
दिनेश झिंगे व अन्य ९ जणांनी लावला २५ लाखांना चुना-अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
Image