लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान 




पनवेल(प्रतिनिधी) सर्वसामान्यांचे आधारवड व दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय युवा मोर्चा पनवेल शहर व ग्रामीण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  
          पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या शिबिरास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, युवा नेते दिनेश खानावकर, चिन्मय समेळ, गौरव कांडपिळे, मयूर कदम, आकाश भाटी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image