डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत आयोजित शिबीरात १ हजार १७७ जणांचे रक्तदान

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत आयोजित शिबीरात १ हजार १७७ जणांचे रक्तदान


नवीन पनवेल  : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रेवदंडा यांच्या वतीने पदमश्री डॉ. श्री दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थरूप डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथील विरुपाक्ष सभागृहामध्ये सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ११७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
       डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीर कार्यक्रमामध्ये श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सर्वत्र रक्ताची गरज भासत आहे अनेकांनी रक्त न मिळाल्याने आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे रक्ताची भासत असलेली गरज दूर करण्यासाठी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॉ. श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत रक्तदान शिबिर राबविण्यात आले. शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी दास भक्तांनी सकाळ पासूनच शिस्तबद्ध पद्धतीने आपला सहभाग घेतला होता. या अगोदरही प्रतिष्ठानमार्फत भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात आली आहे. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन पाटील, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक राजू सोनी, सभापती अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेविका रूचिता लोंढे, डॉ. ययाती गांधी, त्याचबरोबर डी. वाय. पाटील, एम. जी. एम., तेरणा हॉस्पिटल डॉक्टर व त्यांचे सहकारी श्री सदस्य यावेळी उपस्थित होते. 



Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
दिनेश झिंगे व अन्य ९ जणांनी लावला २५ लाखांना चुना-अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
Image