क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच भव्य सभागृह उभारण्यासाठी मंजुरी देण्यात यावी : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनची मागणी....

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच भव्य सभागृह उभारण्यासाठी मंजुरी देण्यात यावी : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनची मागणी....


पनवेल : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनतर्फे पनवेल महानगरपालिकेला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच पनवेल मध्ये भव्य सभागृह उभारावे याकरिता मा.सौ. उपमहपौर सिताताई पाटील व नगरसेक संतोष शेट्टी यांना  निवेदन देण्यात आले, 

     शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच पनवेल ह्या ठिकाणी कुठेच सभागृह व भवन उभारण्यात आले नाही आमचा समाज उपेक्षित राहता कामा नये  म्हणून पनवेल महानगरपालिकेने पनवेल ह्या ठिकाणी एखादा भूखंड ताब्यात घेऊन त्या भूखंडाचा ठराव मंजूर करून भव्य सभागृह व भवन उभारण्यात यावे ही नम्र विनंती..

      सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांनी केले. दलित, शोषित, अशिक्षित समाजासाठी त्यांनी जीवाचे रान केले. अश्या थोर समाजसुधारकांच्या सन्मानप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने सर्वप्रथम मंजूर करावा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच भव्य सभागृह , भवन उभारण्यात यावे अशी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे. सदर अर्जाची दखल घेत यावर तात्काळ विचार करावा अशी नम्र विनंती यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image