छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त श्रीमंत कोकाटे यांचे अभूतपूर्व मार्गदर्शन

छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त श्रीमंत कोकाटे यांचे अभूतपूर्व मार्गदर्शन

नवीन पनवेल : छत्रपती क्रांती सेनापनवेल यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त विशेष प्रबोधन संमेलनाचे आयोजन 12 मे रोजी म्हसकर डेअरी फार्मआकुर्ली येथे करण्यात आले होते. यावेली या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमंत कोकाटे यांचे अभूतपूर्व मार्गदर्शन लाभले

          विविध दाखले देऊन छत्रपती संभाजी राजांच्या कार्याची महती त्यांनी मांडली. चुकीचा इतिहास सांगून महाराजांना बदनाम करणाऱ्यांना सांगलीच चपराक कोकाटे यांच्या भाषणातून जाणवली शिवाजी महाराज असोत किंवा छत्रपती संभाजीराजे असो हे कधीही जातीपातीची लढाई लढले नाहीत तर अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती त्यांनी केली. कित्येक मुस्लिम बांधवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवरायांच्या बाजूने प्रमुख भूमिका बजावली आहे. स्वराज्य स्थापनेच्या दृष्टिकोनातून जोजो स्वराज्याच्या आड येईल त्याला आडवा करण्याचे काम महाराजांनी केलं. स्वराज्यावरती आणि रयतेवर अपार प्रेमएकनिष्ठताकर्तव्यनिष्ठा अशा विविध मुद्द्यांवर शिवनीती बाबत कोकाटे यानी प्रकाश टाकला.

        घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरज्योतिबा फुलेआचार्य अत्रेअमर शेख यांच्या जीवनातील अनेक दाखले श्रीमंत कोकाटे यांनी या भाषणात दिले. रायगडच्या मातीचा इतिहास वेगळा आहे याच रायगडाने महाराष्ट्राला आणि देशाला भरपूर काही दिलं आणि खऱ्या अर्थानं देशाच्या इतिहासाचा साक्षीदार रायगड जिल्हा असल्याचे त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्यामध्ये महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडकेशेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस राजेश केणीक्रांतिकारी सेवा संघाचे नामदेव फडकेसामाजिक कार्यकर्ते शेखर शेळकेप्राचार्य अनंता धरणेकरउद्योजक प्रदीप भोपीग्रामपंचायत सदस्य संदीप म्हस्कर, चंद्रकांत पोपटाड चेतन केणी, अनिल ऊलवेकरसंजय केणी. आकूर्ली आणि सुकापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती सेनेच्या श्रेयस म्हसकरगुरुनाथ पोपेटाबाबा कांबळेविश्वास पाटील आणि कार्यकर्त्यांच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

 


--


Popular posts
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image