लोकनेते मा.रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न

लोकनेते मा.रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न  



पनवेल(प्रतिनिधी) सर्वसामान्यांचे आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या ०२ जूनला ७१ वा वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रमे आयोजित करण्यात आले असून न्हावेखाडी - उत्तर पाडा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी उत्तरपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत भव्य महा आरोय शिबीर आयोजित  करण्यात आले होते. या शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायतीच्या च्या उपसरपंच मंजुषा ठाकूर, माजी उपसरपंच सागरशेठ ठाकूर, शिबीराचे संयोजक तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सी.एल. ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुणशेठ ठाकूर, गोपिचंद ठाकूर, अनंत कडू, तुकाराम मोकल, प्रदिप मोकल, सतीश ठाकूर, सुजित ठाकूर, अनंथ ठाकूर, हिराजी ठाकूर, चंद्रकांत मोकल, प्रविण कालबागे, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर श्याम मोरे, यांच्यासह पदादिकारी, आणि डॉक्टर उपस्थित होते.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image