शिवसत्ता टाइम्स या वेब पोर्टल आणि यू ट्यूब चॅनलचा शुभारंभ संपन्न
शिवसत्ता टाइम्स हे निपक्षपणे काम करणारे नेतृत्व ठरेल - प्रितम म्हात्रे
शिवसत्ता टाईम्सची उभारणी करून योगेश तांडेलने
राज भंडारीच्या स्वरूपात इतिहासाला सुरुवात केली - बबनदादा पाटील
शिवसत्ता टाइम्स चॅनल हे बंद होणारे नाही तर उभारी घेणारे आहे - सुदाम पाटील
शिवसत्ता टाइम्सला राज भंडारींच्या स्वरूपात हिरा मिळाला : अकबर सय्यद
पनवेल : हर्षदा पाटील
पनवेलसह रायगड, नवी मुंबई आणि महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व करण्यासाठी एक आगळा वेगळा विचार समोर आणून शिवसत्ता टाइम्स या वेब पोर्टल आणि यू ट्यूब चॅनलचा शुभारंभ मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील नवीन पनवेल येथील पृथ्वी सभागृहामध्ये दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार होती, मात्र शासकीय कामांचा वाढता ताण लक्षात घेता त्यांनी आपल्या डिजिटल शुभेच्छा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवून कार्यक्रमात हजेरी लावली. यांकऱ्यक्रमाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी शिवसता टाइम्सचे संपादक राज भंडारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या शुभारंभ सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम दादा म्हात्रे यांच्यासह भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पां. पाटील, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, श्रीरामपूर नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक सोमनाथ गांगड, भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अकबर सय्यद, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष सी.पी.प्रजापती आदींसह मान्यवर उपस्थित राहिले. या शुभारंभ सोहळ्याचे निवेदन शिवसेनेचे नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख यांनी केले तर शिवसता टाइम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक योगेश तांडेल आणि दीपांजली तांडेल यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेत्यांसह मित्र परिवाराने आपली हजेरी दर्शविली.

कोट
गेली अनेक वर्षे मी राज भंडारी यांना जवळून पहिले आहे, प्रामाणिक पत्रकार म्हणून त्यांनी आपले काम केले आहे. राजकीय क्षेत्र असो किंवा मग सामाजिक क्षेत्र असो, या कार्यात त्यांचे कार्य मी जवळून पहिले आहे. आज त्यांनी संपादित केलेल्या शिवसत्ता टाइम्स या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनेलमार्फत पत्रकारितेत एका वाहिनीचे नव्याने पदार्पण झाले आहे. या चॅनेलसाठी राज भंडारी यांच्या पाठीमागे खंभीर नेतृत्व हे योगेश तांडेल यांचे लाभले आहे आणि योगेश राज ही जोडी शिवसत्ता चॅनेल हे महाराष्ट्रात खूप मोठे करतील, यामध्ये शंका नाही. मी योगेशजी आणि राज यांना विनंती करतो की, आपले हे चॅनेल निपक्षपाती पणाने काम करून समाजासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून एक आदर्श चॅनेल ठरेल.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेता, पनवेल मनपा
कोट
संपूर्ण महाराष्ट्रात पनवेल हे सगळ्यात मोठे ठिकाण झाले आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे केंद्रबिंदु म्हणून पनवेलची ओळख होत असताना या पनवेलमध्ये योगेश तांडेल आणि दीपांजली तांडेल यांनी शिवसत्ता टाइम्स या चॅनेलची मुहूर्तमेढ रोवली आहे. मात्र यामध्ये त्यांचे आणखी कौतुक करावेसे वाटते ते यासाठी की त्यांनी राज भंडारीसारख्या प्रामाणिक पत्रकाराला संपादक पदाचा दर्जा दिला आहे. राज भंडारी हे अडचणीत होते, आजारी होते, त्यांना आजारातून बाहेर काढून समाजात एका उंचीवर नेण्याचे काम योगेश तांडेल यांच्याकडून झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तर करतोच आहे पण राज भंडारी म्हणजे एक लिखाणाची तोफ आहे आणि ती तोफ तुमच्यासोबत असल्यामुळे आज शिवसत्ता टाइम्स चॅनेलची उभारणी करून एका इतिहासाची ही जणू सुरुवातच आहे.
- बबनदादा पाटील, रायगड जिल्हा सल्लागार, शिवसेना
कोट
राज भंडारी यांच्या नावाचा ज्याठिकाणी संपादक म्हणून उल्लेख करण्यात आला त्याच दिवशी मनाला एक खात्री पटली. शिवसत्ता टाइम्स हे चॅनेल महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले असून ते राज भंडारी संपादित आहे. यावेळी योगेशजींचे अभिनंदन करतो की त्यांनी राज सारख्या एका होतकरू आणि प्रामाणिक पत्रकाराला मोठी जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या काळात हाच राज या चॅनेलला शिखरावर नेईल. राज सोबत मी अनेक कार्यक्रम राबविले, मात्र ज्यापद्धतीने राज याचे लिखाण आहे, त्यामुळे शिवसत्ता टाइम्स हे चॅनेल कधीही बंद होणारे चॅनेल नसून उभारी घेणारे चॅनेल आहे.
- सुदाम पाटील, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
कोट
अनोखी लेखणीचे बाळकडू रक्तात वाहत असलेल्या तसेच पनवेल मधील अव्वल पत्रकारांच्या फळीतील एक उमदा तरुण आज शिवसत्ता टाइम्स चॅनेलचा संपादक झाला. हा तर त्याचा अधिकार आहेच, मात्र त्याच्यासारख्या लेखणीबहाद्दूर तरुणाला यापूर्वीच ही साथ मिळणे गरजेचे होते. शिवसत्ता टाइम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक योगेश तांडेल हे जोहरी आहेत आणि खऱ्या जोहरीलाच हिऱ्याची योग्य पारख कळते, ते त्यांनी आज राज भंडारी याला सोबत घेऊन दाखवून दिले आहे. माझ्यातर्फे शिवसत्ता टाइम्स या चॅनेलला मनपूर्वक शुभेच्छा देतो.
- अकबर सय्यद, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, अल्पसंख्यांक मोर्चा, भाजपा