उरण विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोहित घरत
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ते रोहित श्रीकांत घरत यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. उरण विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष कोण असावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने, लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतल्या होत्या. यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक मते रोहित श्रीकांत घरत यांना मिळाले आहेत. सलग एकाच पदावर तिसऱ्यांदा निवडून येणारे रोहित घरत हे एकमेव व लोकप्रिय उमेदवार तथा पदाधिकारी आहेत.तिसऱ्यांदा रोहित घरत हे उरण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले आहेत.
रोहित घरत हे 2008 पासून काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.2012 साली पनवेल तालुका स्टुडंट कॉलेज काँग्रेस अध्यक्ष पदी त्यांची निवड झाली.2014 साली उरण विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली.2016 साली ते उरण विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले. परत 2018 साली रोहित घरत हे बहुमताने अध्यक्ष म्हणून निवडून आले.आता तिसऱ्यांदा म्हणजेच 2022 साली झालेल्या निवडणुकीत उरण विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी 5649 मते मिळवून रायगड जिल्ह्यात 1 नंबरची मते मिळविली आहेत. अवघे वय वर्षे 28 असलेल्या व शेलघर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील सुपुत्र असलेल्या रोहित श्रीकांत घरत यांनी लहाना पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांवरच उत्तम छाप पाडली आहे.आपल्या कार्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहित घरत यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून विविध क्षेत्रातून, सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.