आपटा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला, सरपंचपदी शिवसेनेच्या सौ नाजणींन खलील पटेल यांची निवड
मुस्लिम महिलेला संधी देऊन शिवसेना जात-पात मानत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध
रसायनी (प्रतिनिधी)-गुरुवार दिनाकं 03 मार्च 2022 रोजी उरण विधानसभा मतदार संघातील पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायतीवर *शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे, आपटा ग्रामपंचायत सदस्या *शिवसेनेच्या सौ नाजणींन खलील पटेल ह्या सरपंच* पदी विराजमान झाल्या आहेत, मुस्लिम महिलेला संधी देऊन शिवसेना जात-पात मानत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शिवसेना- शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडी यांच्या सर्व सदस्य मार्फत सौ, नजणीन खलील यांचीएकमताने निवड झाली आहे,
यावेळी *रायगड उपजिल्हा संघटक श्री परेश भाई पाटील, पनवेल तालुका प्रमुख श्री रघुनाथ मंगल पाटील,* पनवेल तालुका संघटक श्री मर्फी शेठ, केलवणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर साहेब, उपतालुकाप्रमुख श्री डॉक्टर घरत, विभागप्रमुख चंद्रकांत टकले, माजी उपसरपंच ऋषभ धुमाळ, श्री स्वप्निल भुवड,आपटा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, तसेच शाखाप्रमुख राजेंद्र घोलप, शाखाप्रमुख लक्ष्मण बावनदाने, पदाधिकारी व शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.