माणगाव भागातील दिव्यांगांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्रांचे वितरण
*अलिबाग, दि.25 (जिमाका):-* माणगाव उपजिल्हा रुग्णालय आयोजित माणगाव व ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज (दि.25 फेब्रुवारी) रोजी माणगाव येथे करण्यात आले.
दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या प्रत्येक घटकाप्रमाणेच व्यक्तिगत विकास साधता यावा, यासाठी शासनाच्या समाज कल्याण व विशेष सहाय्य विभागाच्या या योजनेचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी केले.
या दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष आनंद यादव, श्रीमती संगिता बक्कम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियंका कांबळे तसेच स्थानिक नगरसेवक, नर्स, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.