छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि अधिकाऱ्यांनी रायगडावर केले अभिवादन
*किल्ल्यावर राबविली स्वच्छता मोहीम*
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपविभागीय अधिकारी महाड श्रीमती प्रतिमा पुदलवाड, कार्यकारी अभियंता रायगड विकास प्राधिकरण श्री. बामणे, श्री.भामरे, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार सचिन शेजाळ, तहसिलदार सुरेश काशीद, पोलीस निरीक्षक श्री. देशमुख तसेच महाड प्रांत व तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव रायगड विकास प्राधिकरण डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगडावर सुरू असणाऱ्या जतन, संवर्धन व विकास कामांची पाहणी केली. या टप्प्यात सुरू असलेली कामे प्रामुख्याने फुटका तलाव, जलस्त्रोतांचे पुनरूज्जीवन, जगदीश्वर मंदिर, फरसबंदी मार्गिका, महादरवाजा तटबंदी संवर्धन, नाने दरवाजा संवर्धन व पुनर्बांधणी तसेच राजमाता जिजाऊ समाधी येथील विकासकामे या कामांची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला तसेच झालेल्या कामांबाबत समाधानही व्यक्त केले. त्याचप्रमाणे कामांच्या प्रगतीत सातत्य ठेवण्याबाबत सूचना प्राधिकरण व विशेष स्थापत्य पथकाच्या अधिकारी वर्गास दिल्या.
यावेळी किल्ल्यावर स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
*सावित्री नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा*
जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी सावित्री नदीमधील गाळ काढण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी कार्यकारी अभियंता श्री.धाकतोडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गाळ काढण्याच्या कामासंदर्भातील आढावा घेतला व गाळ काढण्याचा वेग वाढविण्याबाबत तसेच अन्य सूचना दिल्या.
*पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट*
विंचू दंशावरील औषधोपचाराचा शोध लावून अनेकांचा जीव वाचविण्याचे महान कार्य करणाऱ्या डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आजच्या शिवजयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी डॉ. बावस्कर यांनी "बॅरिस्टरचे कार्ट" हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिले.