राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ
अलिबाग, दि.03,(जिमाका):- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वछता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी दरवर्षी विविध पुरस्कार स्पर्धा घेतली जाते.
सन-2021 च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत दि.15 फेब्रुवारी 2022 असून जिल्ह्यातील पत्रकारांनी या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी दि.01 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. विहीत अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in येथे उपलब्ध आहेत.