विश्वजीत म्हात्रे खेळणार ISPL सीझन 3 च्या दिल्ली सुपर हिरोज संघात..

विश्वजीत म्हात्रे खेळणार ISPL सीझन 3 च्या दिल्ली सुपर हिरोज संघात..


पनवेल/प्रतिनिधी,दि.१०- रायगड आणि महाराष्ट्राच्या क्रिकेट क्षेत्रातील लोकप्रिय खेळाडू विश्वजीत म्हात्रे ISPL सीझन 3 च्या दिल्ली सुपर हिरोज संघात खेळणार  

        धडाकेबाज फलंदाज, सामना जिंकून देणारी कामगिरी करण्याची विश्वजीत म्हात्रे यांची क्षमता असल्याने जागतिक दर्जाच्या क्रिकेट संघात विश्वजीत म्हात्रे हे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या दिल्ली सुपर हिरोज संघात आपला पुढील खेळ खेळण्यासाठी सज्ज झाले आहे.

          विश्वजीत म्हात्रे यांची निवड ISPL सारख्या स्ट्रीट क्रिकेट फॉरमॅटसाठी होणे रायगड पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब ठरत असल्याने ISPL च्या अनेक संघाने त्यांना आपल्या संघात घेण्यासाठी मोठया उत्साह दाखवला मात्र क्रिकेटपटू विश्वजित यांना दिल्ली सुपर हिरोज संघाने लिलावात ₹३ लक्ष मानधनात करार बद्ध केले . या निवडी मुळे पुढील काळात क्रिकेटपटू विश्वजित म्हात्रे यांच्या वर प्रेम करणाऱ्या क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा त्यांच्या कडून अधिक वाढलेल्या असून ते भविष्यात एक कुशल खेळाडू म्हणून महत्त्वपूर्ण योगदान देतील अश्या शुभेच्छा लाखो त्यांच्या चाहत्यांनी समाज माध्यमातून दिल्या.

         रायगडचा सुपुत्र पनवेल येथील दापोली पारगावची शानं असलेल्या विश्वजितला उपसरपंच धीरज पाटील, राहुल म्हात्रे, विकास होनकळस, कुणाल तरेकर,सुहास म्हात्रे, साबीर शेख तसेच पनवेलकर व ग्रामस्थांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. 

         विश्वजित म्हात्रे यांच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीबद्दल आंतराष्ट्रीय स्तरांवर त्यांच्या शैलीची दखल भविष्य काळात icic सुद्धा घेईल आणि देशासाठी तो जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून उदयास येईल अशी इच्छा शुभेच्छा देत पनवेलकरांनी व्यक्त केली