आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस उत्साहात संपन्न
रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका):- मा.मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या सहमतीनुसार व मा.अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग तसेच अलिबाग जिल्हा कारागृह, वर्ग-2,अलिबाग यांच्या समन्वयाने अलिबाग जिल्हा कारागृह येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्क व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ॲड.मानसी म्हात्रे, जेष्ठ विधिज्ञ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दरवर्षी 10 डिसेंबर रोजी जगभर मानवाधिकार दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश बंद्यांचे मुलभूत अधिकार व त्याबद्दल बंद्यामध्ये जागरुकता निर्माण करुन बंद्यांना समान प्रतिष्ठा व बंद्यांच्या हक्काबाबत तसेच बंद्यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार कोठे व कशी करावयाची तसेच तक्रार करताना कोणती दक्षता घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे, यांनी मानवाधिकारांचे रक्षण करणे तसेच तुरुंगामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी तसेच बंद्यांना आपल्या हक्काची जाणीव करुन देवून समानतेच्या वागणुकी विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी पुरुष व महिला बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या कार्यक्रमाकरीता 173 महिला व पुरुष बंदी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे मानवी हक्कांबाबत जागृती होण्यास निश्चितच मदत होईल.
हा कार्यक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे वारके (भा.पो.से) व विषेश पोलीस महानिरीक्षक, कारागृह (दक्षिण विभाग) भायखळा योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे स्वागत अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह यांच्यामार्फत करुन करण्यात आली.
या कार्यक्रमाकरीता अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह विशाल बांदल, ॲड.अे.डी.पाटील (उपाध्यक्ष ),ॲड.अमित देशमुख (सचिव) ॲड.राजेंद्र माळी (खजिनदार) वकील बार असोशिएशन,अलिबाग तसेच ॲड.शेखर कामथे, मुख्य लोक अभिरक्षक, ॲड.निलोफर शेख, ॲड.तन्मय म्हात्रे, सहाय्यक लोक अभिरक्षक, श्रीम.नितल म्हात्रे, लिपिक जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, अलिबाग-रायगड, ॲड.विकास पाटील, ॲड. हिना तांडेल, पॅनेल विधिज्ञ, ॲड.आदित्य कांबळे, ॲड. पुनम राजंणकर, विधी स्वयंसेवक तसेच अलिबाग जिल्हा कारागृहातील अधिकारी किशोर वारगे, तु.अ.श्रेणी-2, श्री.कुटे, सुभेदार व तसेच श्री. वाणी, श्री.वाघमारे का.शिपाई इत्यादी उपस्थित होते.

