खारघर सेक्टर-१५ येथे शेकापच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा

 खारघर सेक्टर-१५ येथे शेकापच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा


खारघर/प्रतिनिधी,दि.२-खारघरमधील सेक्टर १५ स्थित घरकुल कॉम्प्लेक्स गार्डन प्रवेशद्वारावरती शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार सन्माननीय बाळाराम पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे संविधान विश्लेषक ऍडव्होकेट रोशन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

     या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ, घरकुल सेक्टर१५,बौद्धजन पंचायत समिती शाखा-७५१,भारतीय बौद्ध महासंघ,खारघर आणि घरकुल मित्रमंडळ खारघर तसेच सेक्टर-१५ मधील जागरूक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अशोकजी गिरमकर,प्रवीण कदम,महेंद्र सोनवणे,अशोक कोळसुलकर,सुरेश वाघमारे व श्री.ढंगारे यांनी परिश्रम घेतले.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image