प्राईड वन को.ऑप.हौ.सो.लि.काळुंद्रे येथे श्री गणेश मुर्ती प्रतिष्ठापना व मंदिर अनावरण सोहळा उत्साहात संपन्न
पनवेल/प्रतिनिधी,दि.१- प्राईड वन को.ऑप.हौ.सो.लि.,प्लॉट नं.१६, सिडको नोड,मु.काळुंद्रे,पोस्ट- ओ.एन.जी.सी,ता.पनवेल,जि.रायगड येथे श्री गणेश मुर्ती प्रतिष्ठापना व मंदिर अनावरण सोहळा रविवार दि.३० नोव्हेंबर २०२५ रोजी अतिशय जल्लोषामध्ये पार पडला.यावेळी सकाळी श्री गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चारासहित विधिवत करण्यात आली.यावेळी सोसायटी परिसरामध्ये कलशयात्रा व दिंडीचे आयोजन करण्यात आले. टाळ,मृदुंगाच्या गजरात ‘‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया” ‘‘ज्ञानोबा माऊली तुकाराम” या गजराने संपुर्ण काळुंद्रे परिसरामध्ये भक्तीमय वातावरण तयार झाले.यानंतर सोसायटीमध्ये ‘‘श्री सत्यनारायणाची पुजा” देखील आयोजित करण्यात आली.श्री सत्यनारायण पुजा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये सुमधुर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,भजनाने सोसायटीतील सर्व भक्तगण मंत्रमुग्ध झाले नंतर लहान मुलांचा अतिशय सुंदर असा डान्स कार्यक्रम झाला.यावेळी सोसायटीतील सर्व सदस्य, रहिवाशांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.शेवटी हा सोहळा यशस्वीपणे संपन्न व्हावा म्हणून ज्या सभासदांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे आभार व्यक्त करुन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या कार्यक्रमाची सांगता झाली.



