चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे स्किट प्ले स्पर्धा आणि अतिथी व्याख्यान संपन्न

 चांगू काना ठाकूर आर्टस् कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे स्किट प्ले स्पर्धा आणि अतिथी व्याख्यान संपन्न  



पनवेल/प्रतिनिधी,दि.५-

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्कॉमर्स अँड सायन्स   महाविद्यालय येथे विज्ञान संघटना यांच्या मार्फत एचआयव्ही / एड्स जागरूकता आणि प्रतिबंध या विषयावर स्किट प्ले स्पर्धा सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२५ आणि अतिथी व्याख्यान शुक्रवार, दिनांक ५ डिसेंबर २०२५ सकाळी १२.०० वाजता आयोजन करण्यात आले होते.

१ डिसेंबर २०२५ रोजी एड्स दिन निमित्त एचआयव्ही / एड्स जागरूकता आणि प्रतिबंध या विषयावर स्किट प्ले स्पर्धा घेण्यात आली त्यास्पर्धेसाठी  सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रा. एन. पी. तिदार व संस्कृतिक विभागाचे प्रा. गणेश जगताप हे परीक्षक म्हणुन लाभले. ५ डिसेंबर २०२५ च्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अपोलो हॉस्पिटलनवी मुंबई यांच्या प्रभारी अपोलो ब्लड सेंटर व कन्सल्टंट ट्रान्सफ्यूजन मेडिसिन डॉ. दिपाली पाटील या उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालायचे प्राचार्य  प्रो. डॉ. एस. के. पाटीलविज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूरप्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.एम.ए.म्हात्रे व विज्ञान संघटनेच्या प्रमुख  प्रा. डॉ. वाय. एस. मुनीव  यांनी उपस्थिती दर्शविली.त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान विभागाच्या  प्रा. डॉ. अनुप्रिता वाठारकर यांनी  प्रमुख पाहुणे डॉ. दिपाली पाटील यांचा परिचय  उपस्थितांना करून दिला.

प्रमुख पाहुणे प्रा डॉ. दिपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,  एचआयव्ही / एड्स हे दोन वेगवेगळे घटक आहेत. ज्यांना एचआयव्ही / एड्स बद्दल माहित आहे त्यांनी नेहमी सकारात्मक माहिती द्यावी. जसे एचआयव्ही / एड्स  हा आजार संक्रमित जोडीदारासोबत असुरक्षित लैंगिक संबंधइंजेक्शनच्या सुया शेअर करणेसंक्रमित आई कडून गर्भाला होणारा संसर्ग आणि रक्त संक्रमनामधून होणारा संसर्ग अश्या कारणांमुळे होतो. तसेच एचआयव्ही / एड्स हा एकच फक्त संसर्ग जन्या आजार नसून असे खूप सारे आजार आहे जसे सारख्याच कारणांमुळे पसरणारे आजार म्हणजे हॅपेटायटिस बी, हॅपेटायटिस डी, मलेरिया इत्यादी  त्याचबरोबर त्यांनी एचआयव्ही / एड्स होण्या मागील कारणे आणि विंडो पिरेड म्हणजे काय हे देखील सांगितले. त्यामुळे उपचारापेक्षा खबरदारी चांगली असे विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले . तसेच या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विभागाची विद्यार्थिनी कु. सिद्धी मुंढे हिने केले. तसेच १ डिसेंबर २०२५ झालेल्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रा. एम. डी. वैशंपायन आणि  ५ डिसेंबर २०२५ झालेल्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. शाहीन शैख यांनी केले. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये  स्किट प्ले स्पर्धातील प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.