इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये जासईच्या साहिल म्हात्रेची निवड; पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी केले अभिनंदन
पनवेल : उरण तालुक्यातील जासई गावातील साहिश सुरेश म्हात्रे याची भारतातील सर्वात मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) मध्ये सिनेस्टार अक्षय कुमार यांच्या मालकीच्या “श्रीनगर के वीर” या संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल भाजपचे नेते, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी त्याचे अभिनंदन केले.
