चांगु काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,न्यूपनवेल(अधिकारप्रदत्त स्वायत्त)येथे आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

चांगु काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज,न्यूपनवेल(अधिकारप्रदत्त स्वायत्त)येथे आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा संपन्न



 

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्तआणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

          या आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळाचे संचालक तसेच पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचबरोबर  चांगु काना ठाकूर आर्टस्कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेजचे प्राचार्य व मुंबई शहर झोन-१चे उपाध्यक्ष मा. प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मुंबई शहर झोन- सचिव डॉ.मनोज वर्मा , मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक व मुंबई उपनगर सचिव डॉनिलम पाटील  यांची उपस्थिती लाभली.

  या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठातील ४२२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच पुरुषांमध्ये प्रथम सर्वात्कृष्ट खेळाडूचे स्थान ठाकूर महाविद्यालय, कांदिवली,  द्वितीय स्थान आर.जे. महाविद्यालय, घाटकोपर आणि तृतीय स्थान के. ई. श्रॉफ  महाविद्यालय, कांदिवली यांनी पटकावले त्याचबरोबर महिला विभागामध्ये प्रथम सर्वात्कृष्ट खेळाडूचे स्थान ठाकूर महाविद्यालय, कांदिवली, द्वितीय स्थान एस.आय.ई.एस महाविद्यालय, नवी मुंबई  आणि  तृतीय वर्तक महाविद्यालय, वसई यांनी पटकावले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईकसहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील जिमखाना विभागाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. 


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image