पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे - आमदार प्रशांत ठाकूर
चौकट – महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम पनवेल मतदारसंघातील घरगुती उद्योगांना नवी दिशा देणारा ठरत आहे. महिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीपासून समाजाच्या प्रगतीपर्यंत मोठा सकारात्मक बदल घडतो. त्याची जाणीव ठेवूनच आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संबंधित प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला.या उपक्रमासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. योजना पारदर्शक राहावी यासाठी इच्छुक महिलांकडून घरघंटी किंवा शिलाई मशीनसाठी अर्ज मागविण्यात आले. या अर्जांची व कागदपत्रांची शासकीय निकषांनुसार पडताळणी करण्यात आली आणि नियमांनुसार पात्र ठरलेल्या महिलांना मशीन आणि प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून पनवेल मतदारसंघातील महिलांच्या आर्थिक प्रगतीस चालना देणारे आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी मार्ग अधिक व्यापक झाला आहे. त्यामुळे महिलांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यापुढील टप्प्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार असून इच्छुक महिलांनी नोंदणी केल्यास आगामी आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या निधीतून त्यांना लाभ मिळू शकणार आहे.

