पुष्पक नगरचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मार्फत पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन
पनवेल, दि. १९ ( संजय कदम ) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी पुष्पक नगर निर्माण होत आहे. मात्र विमानतळा शेजारी असून सुध्दा पुष्पक नगरचा प्रचार व ज्या प्रकारे प्रचार व प्रसार व्हायला हवा होता तसा झालेला नसल्याने येथील स्थानिक भूमिपूत्र व त्यांच्या सोबत काम करणारे बांधकाम व्यवसायिक यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेच अध्यक्ष सुनिल काशिनाथ कटेकर यांनी पुढाकार घेवून पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन केले असल्याची माहिती आज काळभैरव मंदिर, आर 3, चिंचपाडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले .
या पत्रकार परिषेदेला बांधकाम व्यवसायिक अनिल सिंघवी , नागेश सुरवसे , सुनिल काशिनाथ कटेकर, संतोष सुतार आदी मान्यवर उपस्थित होते . सदर पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 हे २२ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रोटरी पनवेल फेस्टिव्हल, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी , पनवेल येथे करण्यात आले असून पुष्पक नगर हे आगामी काळात सर्वाधिक गतिमान आणि प्रतिष्ठित ठिकाण म्हणून ओळख होणार असून जास्तीत जास्त लोकांनी येथे आपली घरे घ्यावीत यासाठी पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन केले असल्याची माहिती सुनिल काशिनाथ कटेकर यांनी दिली . आगामी काळात सिडकोसह इतर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार आहे . पुष्पक नगर ही वेगळी ओळख लोकांना दिसणार आहे . विमानतळापासून हाकेच्या अंतरावर हे नगर असल्याने लोकांना याठिकाणी राहण्यास आवडणार आहे . या भागातील प्रकल्पग्रस्त बांधकाम व्यवसायिक याना बरोबर घेऊन हे पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन केल्याची माहिती अनिल सिंघवी यांनी दिली . तरी जास्तीत जास्त पनवेलवासीय व नवीमुंबई परिसरातील नागरिकांनी या प्रॉपर्टी एक्सपो 2025 मध्ये सहभाग घेवा . असे अहवाहन संतोष सुतार यांनी केले आहे .
