नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर - थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार !

 नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर - थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार !

मालमत्ताकराचा भरणा तात्काळ करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन ; अन्यथा होणार कारवाई!



 

            नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ताकर विभागाकडून थकबाकीदारांविरुद्ध जप्तीपूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. एकूण थकबाकीदारांपैकी आतापर्यंत ६४५ नागरिकांना ७ दिवसांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. तर २१८ नागरिकांना ४८ तासांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर न भरल्यास पुढील टप्प्यात महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.

            मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत असून यातूनच नागरिकांना विविध सेवा सुविधांची पूर्तता केली जाते. त्यामुळे कर भरण्याबाबत सातत्य नसल्यास त्याचा शहरातील विकासकामांवर परिणाम होतो. त्या अनुषंगाने थकबाकीदारांना दिलेली जप्तीपूर्व नोटीस ही नागरिकांना दिलेली अंतिम सूचना आहे. जप्तीसारख्या कठोर कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत करभरणा करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांचेमार्फत करण्यात आलेले आहे.

 

सुलभ व सहज कर भरणा करण्यासाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध

 

            नागरिकांना करभरणा करण्यासाठी कोणत्याही महानगरपालिका कार्यालयात जावे न लागता घरबसल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मालमत्ताकर विभागाने सर्व डिजिटल पेमेंट पद्धती उपलब्ध करून दिल्या असून त्याचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे केला आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉट (८२९१९२०५०४), My NMMC (माझी नवी मुंबई ) अॅप, www.nmmc.gov.in ही महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट, तसेच प्रत्येक कर देयकावरील क्यूआर कोड (QR Code) स्कॅनींग त्याचप्रमाणे फोन पे, जीपे अशा विविध युपीआय माध्यमांद्वारे पेमेंट करण्याच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी मालमत्ताकर धारकांनी याचा लाभ घेऊन त्वरित करभरणा करावी आणि कटू कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे. 


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image