वाहतूक पोलिसांचा प्रामाणिकपणा; दागिन्यांची पिशवी केली परत

वाहतूक पोलिसांचा प्रामाणिकपणा; दागिन्यांची पिशवी  केली परत 


पनवेल दि.१८(संजय कदम) : कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे दुचाकी वरून पडलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून ती त्यांना परत करण्यात आल्याने मलबारी कुटुंबीयांनी कळंबोली वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत.   

       स्वप्नील श्याम मलबारी रा खारघर  हे आपल्या कुटुंबियांसह वाहनावरून कळंबोली सर्कल येथून जात असताना सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असलेली बॅग ती त्या परिसरात खाली पडली परंतु ही बाब त्यांच्या लक्षत आली नाही आणि ते पुढे निघून गेले. दरम्यान तेथे कर्तव्यावर असणारे पोळीला हवालदार भोईर व पोलीस शिपाई राठोड यांच्या निदर्शनास ही बॅग आली. ताडोबाने सदर बॅग त्यांनी ताब्यात घेऊन मलबारी कुटूंबियांशी संपर्क साधून आतील गोष्टींची शहानिशा करून सदर बॅग मलबारी कुटुंबियांना परत केली. यावेळी मलबारी कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले व त्यांनी वाहतूक शाखेचे आभार मानले आहेत.  


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image