खोपोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपा महायुतीची उत्साहपूर्ण प्रचारफेरी

 खोपोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपा महायुतीची उत्साहपूर्ण प्रचारफेरी

 


खोपोली नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा महायुतीतर्फे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचंड उत्साहात पार पडलेल्या या प्रचारफेरीत कार्यकर्त्यांनी विजयी घोषणांनी आसमंत दुमदुमून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या जोशपूर्ण वातावरणाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रचारफेरीत भाजपाचे खोपोली निवडणूक निरीक्षक पनवेलचे माजी नगरसेवक तसेच भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, निरीक्षक भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. भाजपा महायुतीचे उमेदवार इंदरमल खंडेलवाल, संजय तन्ना, मयुरी शेलार आणि सोनिया रुपवते यांनी नागरिकांशी संवाद साधत पक्षाची विकासनिष्ठ भूमिका पटवून दिली. या उमेदवारांच्या उत्साही सहभागामुळे आणि प्रभावी जनसंपर्कामुळे जनतेची मने जिंकण्यात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र दिसून आले.


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image