उरण विधानसभा मतदार संघात ६०,००० हुन अधिक मतदार बोगस असण्याची शक्यता

उरण विधानसभा मतदार संघात ६०,००० हुन अधिक मतदार बोगस असण्याची शक्यता.राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांचा आरोप.;तहसीलदारांकडे नोंदविल्या हरकती.




उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )उरण तहसील कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेतली.उरण मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत असलेल्या डुप्लिकेट मतदार, हटवलेले मतदार आणि नवे जोडलेले मतदार यांची जवळ जवळ साडेअकराशे पानांच्या याद्या सुपूर्द केले. आक्षेप आणि सूचना करण्याची शेवटची तारीख असल्याने भावना घाणेकर यांनी तहसीलदारांकडे मतदार संदर्भात हरकती घेऊन विविध समस्या तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्या.यामध्ये उरण विधानसभेच्या निवडणुकीत जवळजवळ ६० हजाराहून अधिक मतदार हे बोगस मतदार असल्याचे निदर्शनास आणून दिले. उरण विधानसभा मतदार संघातील / क्षेत्रातील मतदारांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे तहसीलदार यांनी आश्वासित केले.असे भावनाताई घाणेकर यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार उद्धव कदम यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले.

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image