बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये क्ले आर्ट स्टुडिओचे उद्घाटन

बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये क्ले आर्ट स्टुडिओचे उद्घाटन



नवी मुंबई/प्रतिनिधी,दि.१३-बौद्धिक दिव्यांग मुलांना देशाच्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न म्हणून “प्रोजेक्ट सांझी माटी” या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था, प्रादेशिक केंद्र, नवी मुंबई येथे दिनांक 11ऑक्टोबर 2025 रोजी रोटरी क्लब सनराईज खारघर यांच्या सहकार्याने सी.एस.आर. उपक्रमांतर्गत “क्ले आर्ट स्टुडिओ”ची स्थापना करण्यात आली. हा प्रकल्प “वोकल फॉर लोकल” या संकल्पनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत दिव्यांगजनांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा एक प्रयत्न आहे.

क्ले आर्ट स्टुडिओच्या उद्घाटन प्रसंगी श्री. हर्ष मोकल, जिल्हा राज्यपाल, रोटरी क्लब नवी मुंबई; श्री. अमरेंद्रकुमार शाह, अध्यक्ष, रोटरी क्लब सनराईज खारघर; श्री. निलेश मिश्रा, सचिव, रोटरी क्लब सनराईज खारघर आणि श्री. एम. प्रकाश, प्रकल्प व्यवस्थापक, रोटरी क्लब सनराईज खारघर उपस्थित होते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. हर्ष मोकल यांनी रोटरी क्लब सनराईज खारघर तर्फे बौद्धिक दिव्यांगजनांसाठी प्रायोजित निरामया आरोग्य विमा योजनेच्या पावत्या वितरित केल्या तसेच भविष्यात संस्थेसोबत विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.

हा कार्यक्रम संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ रवी प्रकाश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयन श्रीमती कविता आर., पुनर्वसन अधिकारी, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था, प्रादेशिक केंद्र, नवी मुंबई यांनी केले.

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image