निर्भीड निर्भय निपक्षपाती लिहणारे स्तंभ लेखक सागर तायडे

निर्भीड निर्भय निपक्षपाती लिहणारे स्तंभ लेखक सागर तायडे




    आयु.सागर रामभाऊ तायडे यांच्या संदर्भात खर तर लिहीत असताना खूप बरे वाटते. त्याचे कारण की त्यांच्या लेखणी मधे सामन्य माणसाच्या वेदना कशा आहेत.त्यांना न्याय देण्यासाठी कोणत्या प्रकारची गरज आहे. आजपर्यंत ती गरीब माणसे न्याया पासून वंचित का राहिली. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवेत, ती ना होण्याची कारणे काय? भारतीय संविधानामध्ये इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय,अनुसूचित जमाती यांच्या प्रगतीच्या दृष्टीने तरतूद करण्यात आली असताना ती प्रगती च्या दिशेने जाण्यासाठी विलंब का होत गेला. त्याची कारणे काय? अश्या सर्व बाबतीत त्यांचे लिखाण बघितले तर खरच निर्भीडपणे लिहणारा लेखक,सामान्य माणसाच्या हितासाठी,कल्याणासाठी लिहणारा स्तंभलेखक म्हणुन मला सागर तायडे महाराष्ट्रात दिसतात. त्यांचे लिखाण हे मग असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी असेल, की कौटुंबिक कलह निर्माण होऊ नये यासाठी असेल, या सडेतोड पणे चुकलेल्या राजकीय घडामोडी वर असेल, सामाजिक प्रबोधन करणारे असेल,या धार्मिक संदर्भात असेल, जे जनहिताच्या दृष्टीने योग्य आहे असे त्यांनी लिखाण केले आहे.
  महाराष्ट्रात जवळपास साठ दैनिका मध्ये सातत्याने त्यांचे लेख असतात. मग त्यात दैनिक मुक्त नायक कोल्हापूर असेल, या दैनिक जनतेचा महानायक मुंबई मध्ये असेल, दैनिक विश्वपथ मुंबई मध्ये असेल,कोकण सकाळ मध्ये असेल, या मग दैनिक विदर्भ मतदार अमरावती, दैनिक भंडारा पत्रिका भंडारा मध्ये असेल, या दैनिक चन्द्र धून चंद्रपूर मध्ये असेल, या दैनिक जनसत्य, या दैनिक विश्व विजेता असेल, या दैनिक कटू सत्य असेल, दैनिक देशोन्नती असेल, नागपूरचा दैनिक बहुजन सौरभ असेल,बीड चा आमचा अभिमान असेल,लातूरचा महापर्व,दैनिक अजिंठा टाईम्स ,लातूर प्रभात,युवा छत्रपती,युतीचक्र,नांदेडचे युगांतर,श्रमिक एकजूठ,रिपब्लिकन गार्ड,परभणीचा शिल्पकार अशा अनेक जिल्ह्यातील दैनिका मध्ये त्यांचे आलेले लेख हे सामान्य माणसाला न्याय मिळण्या च्या दृष्टीने प्रबोधनात्मक असतात. त्यांचा लिखाणा संदर्भात त्यांना बर्‍याच लोकांनी, निर्भीडपणे लिहणारा स्तंभलेखक म्हणुन अभिप्राय ही दिलेला आहे.
    मी मागील पाच वर्षापासून त्यांचे लिखाण वाचतो आहे. त्यांच्या अनेक लेखासंबंधी माझा अभिप्राय ही असतो. असे निर्भीड लेखक फार कमी असतात. अशा चांगल्या लेखकाच्या पाठीशी राहणे म्हणजे समता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या महापुरुषांच्या विचारांच्या आदर्शाचा सन्मान करणे होय.सागर तायडे यांचा लेख महाराष्ट्रात रोज कोणत्या ना कोणत्या तरी दैनिकात राहतो हे मात्र निश्चित आहे. ते सत्यशोधक कामगार संघटना मुंबई चे संस्थापक सदस्य आहेत. आज ते अध्यक्ष आहेत. ते स्वतंत्र मजदूर युनियन चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे.असंघटित बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देणाऱ्या ७४ ट्रेड युनियन अॅक्ट नोंदणीकृत संघटनांची स्वतंत्र कृती समितीचे ते अध्यक्ष आहेत. ते निर्व्यसनी असून, निर्भीड वक्ता आहेत. ते असंघटित क्षेत्रातील कामगारांना,नाका कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करून न्यायसाठी लढणारे व प्रयत्न करणारे नेते असल्याने त्यांना गरिबाची जाणीव आहे. त्यांचे प्रेरणास्थान हे बुद्ध, महात्मा फुले,रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडे, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर असल्याने त्यांच्या लेखणीची धार ही सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी असते. त्यांचे हृदय हे विशाल सागरा प्रमाणे आहे. त्यांच्या मनात द्वेष नाही. केवळ माणसाने,माणसाला माणूस म्हणून समजावीत. चुकीच्या दिशेने जाऊ नये. ते गेल्याने माणसाच्या वाट्याला दुःख येतात. माणसे दुःख मुक्त व्हावी या उद्देशाने त्यांचे सातत्याने लिखाण असते. त्यांच्या लिखाणातून अनेकांना खर समजून येते. त्यांना महापुरुषांच्या विचारांची जाणीव होते. ते प्रेरणा घेऊन न्यायासाठी लढण्यास तयार होतात. ती लाट म्हणजे क्रांतिकारी विचार होय. त्यांचा समुह होय. "क्रांतीकारी विचारांच्या सागर लाटा" या पुस्तकाचे लेखक सागर तायडे मुंबई हे एक निर्भीड लेखक म्हणून सन्मानास पात्र आहे. त्यांच्या ३ ऑक्टोबर ६४ व्या जन्म दिना निमित्याने मी दरवर्षी माझे मनोगत व्यक्त करत असतो. त्यांच्याशी मी नेहमीच बोलतो. पण त्यांच्या दैनिकातील वाचकाशी त्यांच्या जन्म दिनानिमित्या हार्दिक मंगल कामना देतांना आपल्या समोर व्यक्त होतो. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. 
अविनाश टिपले चंद्रपूर 7875909804