दिवाळी अंकामुळे दिवाळी सण ज्ञानाचा उत्सव–महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष सदानंद मोरे
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडून शुभेच्छा आणि कौतुक
कोट- माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सन १९९५ पासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत उपक्रम अखंडपणे करत आहे.
या उपक्रमांपैकीच लोकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हृदयाच्या जवळची अशी दिवाळी अंक स्पर्धा विशेष ठरली आहे. रायगड जिल्ह्यापासून सुरुवात झालेल्या या स्पर्धेने आज राज्यस्तरीय व्यासपीठ गाठले आहे. याला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अनेक वर्षांपासून मिळत असलेले सहकार्य आणि साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या स्पर्धेचे रूप अधिकच भव्य झाले आहे. आज ही स्पर्धा केवळ स्पर्धा राहिली नाही, तर ती सर्जनशीलतेचा उत्सव ठरली आहे. या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार- आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष - श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ


