शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन 

पनवेल/प्रतिनिधी,दि.२२- शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपले आदर्श मानून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त  पनवेल शहरातील डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासह यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर यांच्यासह इतर रयत सेवकांनी कर्मवीरांना अभिवादन केले.