आरपीआयच्या पनवेल शहराध्यक्षपदी निलेश सोनावणे यांची निवड;
पत्रकार ते राजकीय वाटचालीकरिता पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा
पनवेल -- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी निलेश सोनावणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. निलेश सोनावणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी सोनावणे यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी दैनिक वादळवारा संपादक विजय कडू, दैनिक सामनाचे पत्रकार संजय कदम, केवल महाडिक, नितीन जोशी, राज भंडारी, अनिल राय, लालचंद यादव, अण्णा आहेर, शंकर वायदंडे, राजेंद्र कांबळे रवी पाटील, तुलसीराम बोरिले, रवींद्र गायकवाड पत्रकार उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार रेगे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड , पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी निलेश सोनावणे यांची निवडी करण्यात आली आहे . सामाजिक कार्याची जाणीव असलेले निलेश सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल तालुक्यात सामाजिक कार्य करीत आहे ,दलित, बहुजन चळवळीतील तरुण ताडडफदार कार्यकर्ता म्हणून त्यांची रायगड जिल्ह्यात ओळख आहे आपल्या निर्भीड,निडर पत्रकारितेची देखील छाप त्यांनी जिल्ह्यत पडली आहे गेली अनेक वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून पनवेल युवा या वृत्तपत्राचे संपादक आहेत. पत्रकारिता करीत असताना आता सोनावणे यांनी राजकीय क्षेत्रात थेट पनवेल शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहर अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतली आहे त्यांचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव पाहता त्यांना पनवेल शहरांची जबाबदारी देण्यात आली असून. या निवडीबद्दल पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी पनवेल शासकीय विश्रामगृह येथे जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी सोनावणे यांचा सत्कार करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांनी मनोगत व्यक्त करीत सोनावणे यांना पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
दिबांच्या नावासाठी पत्रकारांची मागणी
प्रकल्पग्रसतांचे नेते लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला दयावे यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त, राजकीय क्षेत्रातून पाठिंबा पाठपुरावा सुरु असतानाच दिबांच्या नावासाठी पत्रकारांनी एक पाऊल पुढे टाकले असून लवकरच पत्रकारांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उड्डाणंमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती निलेश सोनावणे यांनी दिली आहे