रोटरी क्लब खारघर मिडटाऊनचा स्तुत्य उपक्रम रोटरी क्लब हे शिक्षण,मुलांचा सर्वांगीण विकास यासाठी नेहमीच कार्यरत असते
खारघर/प्रतिनिधी दि.१८-रोटरी खारघर मिडटाऊन तर्फे उरण जवळ चिरनेर येथील स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत सार्वजनिक घोषणा प्रणाली बसविण्यात आली. या प्रणाली मुळे एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, समन्वय साधणे शिक्षकांना सोपे होणार आहे . याचा उपयोग रोजची प्रार्थना करणे, महत्त्वाच्या सुचना देणे, विशेष प्रसंगी सुचना व माहिती देणे , शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच क्रिडा आयोजनासाठी वापर केला जाणार आहे.
ही शाळा निवासी शाळा असून येथे 223 विद्यार्थी शिक्षण घेतात.
या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष रो रविकिरण , रो डॉ कोमल गुंडेवर , मुख्याध्यापक अप्पासाहेब , शाळेतील शिक्षक व 223 विद्यार्थी उपस्थित होते.