स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने केले यशस्वी उपचार - इन्सुलिनची आवश्यकता ३१ युनिट्सवरून केवळ २ युनिट्सपर्यंत केली कमी

 १२ वर्षांच्या मुलीची टाइप १ मधुमेहावर यशस्वीपणे मात*


स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने केले यशस्वी उपचार - इन्सुलिनची आवश्यकता ३१ युनिट्सवरून केवळ २ युनिट्सपर्यंत केली कमी


*नवी मुंबई* : एकेकाळी दररोज ३१ युनिट्स इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या टाइप १ मधुमेहाने पिडीत १२ वर्षांच्या धारित्रीला रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांनी यशस्वी उपचार केले. तिच्या शरीरात असाधारण बदल दिसून आले, आता त्वरित उपचारानंतर तिला दररोज केवळ २ युनिट्सची आवश्यकता भासते आहे.

कलकत्त्याला राहणारी १२ वर्षाच्या धारित्रीला वारंवार लघवी होणे, सतत तहान लागणे, अचानक वजन कमी होणे आणि थकवा येणे यासारखी असामान्य लक्षणे दिसून येऊ लागली. काळजीपोटी तिच्या पालकांनी त्वरीत वैद्यकीय तपासणीसाठी नेले, जिथे तिला टाइप १ मधुमेह असल्याचे निदान झाले, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन हे उत्पादक पेशींवर हल्ला करते. कमी वयात, इन्सुलिनचा इतका उच्च डोस आव्हानात्मक होता कारण त्यासाठी दररोज अनेक इंजेक्शन्स, योग्य आहार आणि सतत आरोग्य तपासणी करणे आवश्यक होती.

डॉक्टरांनी इन्सुलिन थेरपी, पुरक आहार, जीवनशैलीत बदल आणि वेळोवेळी निरीक्षण यांचे एकत्रितरित्या उपचार योजना तयार केली. कालांतराने, धरित्रीच्या शरीराने अपेक्षेपेक्षा खूपच चांगला प्रतिसाद दिला. सातत्यपूर्ण काळजी घेतल्याने, तिची इन्सुलिनची आवश्यकता दररोज ३१ युनिट्सवरून फक्त २ युनिट्सपर्यंत कमी झाली. टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांमध्ये अशी ही तीव्र घट क्वचितच दिसून येते.

*स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. प्रदीप महाजन,* धारित्रीसारख्या प्रकरणात टाईप १ मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांमध्ये वेळीच निदान, योग्य व्यवस्थापन आणि काळजीचे महत्त्व अधोरेखित करतात. मधुमेह म्हणजे आयुष्यभर इन्सुलिनवर अवलंबून राहणे मानले जाते, परंतु जेव्हा वेळीच उपचाराने परिस्थिती सुधारत असल्याची प्रचिती प्रकरणातंर्गत आली आहे.  आज धरित्री ही तिच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे शाळेत जाणे, खेळणे आणि दैनंदिन कामं करु शकते. तिच्या कुटुंबाला तिची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित तपासणी, योग्य पोषण आणि तणावाचे व्यवस्थापन राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तिला दिवसाला ३१ इंजेक्शन्सची आवश्यकता आहे, तेव्हा आम्ही खूप निराश झालो. पण आता, तिला फक्त २ युनिट्स इन्सुलिनवर अवलंबून रहावे लागत असल्याने हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. सुरुवातीला आम्हाला विश्वासच बसत नव्हता, पण दररोज तिच्या प्रकृतीत सुधारणा  दिसून येत आहे. डॉ. महाजन आणि त्यांच्या टीमचे खूप आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया तिचा भाऊ श्रीजामी याने व्यक्त केली.