रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68 व्या वर्धापनदिना निमित्त पनवेल येथे आढावा बैठक संपन्न

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68 व्या वर्धापनदिना निमित्त पनवेल येथे आढावा बैठक संपन्न  


पनवेल / प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68 वा वर्धापनदिन महाड येथील क्रांती भूमित 3 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे ,या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, सूचना, जबाबदार्‍या या बाबत मार्गदर्शन करण्याकरिता पनवेल महानगर पालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे तसेच पनवेल तालुका रिपाई  च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे, मुंबई प्रांताध्यक्ष सिद्धार्थ कासारे,रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश कमिटी सदस्य सुमित मोरे, कोकण युवा अध्यक्ष सुशांत सकपाळ हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.

रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी उपस्तिथ कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री डॉ  रामदासजी आठवले यांच्या आदेशाने वर्धापन दिन महाड येथील क्रांती भूमीत  साजरा होत आहे  रिपाई चे  सर्व पदाधिकारी   या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी ठीक ठीक मार्गदर्शन बैठक घेत  आहेत रायगड जिल्ह्यात देखील सर्व तालुक्यात या बैठक मी घेत  असून कार्यकर्ते तयारीला  लागले आहेत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्तितीत हा कार्यक्रम  होणार आहे अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने कार्यकर्त्यांनी उपस्तिथ रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केले आहे .

ज्या महाड क्रांतिभूमीवर समतेची बीजे रोवली गेली त्या महाड क्रांतिभूमीत ६८ वा वर्धापन दिन यशस्वी होईल असे प्रतिपादन कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले   केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ रामदास जी आठवले यांनी काम करण्याची संधी दिली आहे ती निश्चितच यशस्वी करून दाखवू असे देखील मोरे यांनी सांगितले ,यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ,कोकण प्रदेश युवा अध्यक्ष सुशांत सकपाळ , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे ,पनवेल तालुका अध्यक्ष विजय पवार ,पनवेल  महानगर पालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे ,यांनी देखील उपस्तिथ कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले यावेळी प्रास्ताविक पनवेल महानगर पालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मोहन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केले बैठकीच्या कामकाजाचे सूत्र संचलन  महापालिका क्षेत्र सरचिटणीस  मिलिंद कांबळे यांनी केले    

या बैठकीला पनवेल तालुका अध्यक्ष विजय पवार, पनवेल महानगर पालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंगोले,पनवेल जिल्हा युवा अध्यक्ष अक्षय अहिरे, कामोठे शहर अध्यक्ष मंगेश धिवार, नवीन पनवेल अध्यक्ष अंकुश सोनावणे, सरचिटणीस मिलिंद कांबळे, गौतम पाटेकर, यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

रायगड जिल्ह्यात काही कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्यामध्ये जसे इतर पक्षात  मतभेद असतात तसे आमच्याकडे हि आहेत मात्र जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी तालुका अध्यक्ष  याना सोबत घेऊन मी काम करीत आहेत . पनवेल शहर अध्यक्ष म्हणून नुकतीच आम्ही सामाजिक कामात अग्रेसर असलेले निलेश  सोनावणे यांच्यावर जबाबदारी दिली आहे  .--- नरेंद्र गायकवाड ,रायगड जिल्हा अध्यक्ष रिपाई .

चौकट

 डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीवर लढा दिला आणि यशस्वी देखील केला,शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी डॉ बाबासाहेब  आंबेडकर लढले होते  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेत येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी खासदार दि बा पाटील यांनी अनेक आंदोलने केली आज येथील शेतकऱयांच्या  पाठीशी दि बा पाटील साहेब कायम उभे राहिले असल्याने प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे अशी आग्रही भूमिका आमची देखील आहे . प्रकाश मोरे , कोकण प्रांत अध्यक्ष रिपाई