नागरिकांनी मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

 

नागरिकांनी मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर






पनवेल (प्रतिनिधी) केंद्रातील मोदी सरकार हे विविध कल्याणकारी योजना नागरीकांसाठी राबवत आहे. या योजनांचा लाभ नागरीकांनी घ्यावा तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ठाकूर यांनी रोजबाजार येथे आयोजीत करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिर आणि कल्याणकारी योजांच्या शिबिरावेळी केले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या शिबिराचे उद्घाटन डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते यांच्या हस्ते झाले.

पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमीत्त सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत आणि पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वतीने विविध कल्याणकारी योजना तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी, मोफत आरोग्य मुल्यमापन तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी पेन्शन योजना, राष्ट्रीय वयोश्री योजना, आयुष्मान भारत योजना, तसेच ज्येष्ठ नागरीक कार्ड योजनेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपीळे, डॉक्टर गिरीश गुणे, वर्षा ठाकूर, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अमरीश मोकल, पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, प्रितम म्हात्रे, सपना पाटील, लिना पाटील, कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष अनिल खोपडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये 54 महिलांची कॅन्सर तपासणी, 105 जणांचे आरोग्य मूल्यमापन करण्यात आले तसेच 27 जणांनी प्रधानमंत्री श्रमजीवी योजना, 84 जणांनी इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन योजना तर 47 जणांनी आयुष्यमान भारत योजनेचे फॉर्म भरले. 

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image