समाज हितासाठी खर्च करा या विचारानुसार पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा वाढदिवस खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने साजरा
खारघर/प्रतिनिधी,दि.६-खारघर पनवेलचे कार्यसम्राट व कार्यतत्पर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या सहकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की त्यांचा वाढदिवस हा समाज हितासाठी खर्च करत अथवा प्रेम व्यक्त करा कृतीतून या भावनेतून साजरा करण्याचे सांगितले होते. सदर आवाहन खारघर येथील भारतीय जनता पार्टीचे मंडळ उपाध्यक्ष व खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील तसेच पनवेल महानगरपालिकेच्या मा नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने खारघर सेक्टर 19 येथील खेळाच्या मैदानात प्री-इंटर स्कूल बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करून साजरा केला.
खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने खारघर शहरातील व परिसरातील मुला मुलींना नेहमीच *मोबाईल से मैदान तक* या दृष्टिकोनातून तरुणांना विविध खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध खेळांचे सामने तसेच स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचा वाढदिवस हा 5 ऑगस्ट रोजी असतो त्याचे औचित्य साधात रविवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी प्री इंटर स्कूल बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये खारघर मधील जवळपास आठ शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या २० संघांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे उद्घाटन भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी व स्टेट बॉक्सिंग प्लेयर सिद्धेश टावरी व अरुण ससमल केंद्र सरकारच्या सेवेतील सेवानिवृत्त एक्साईज उपायुक्त व बास्केटबॉल खेळाडू यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून व श्रीफळ अर्पण करून करण्यात आले.
सिद्धेश टावरी यांनी उद्घाटन पर बोलताना खेळाडूंना सांगितले की खेळात जय-पराजय हे सुरूच असते परंतु खेळणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.
सदर सामन्यांना भेट देण्यासाठी दिवसभरात अनेक मान्यवर आले प्रामुख्याने पनवेल महानगरपालिकेचे मा.सभागृह नेते परिश ठाकुर संध्याकाळच्या वेळेस लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देखील भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच खारघर स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष किरण पाटील व नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने प्रभागातील तसेच खारघर शहरातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचे कौतुक केले.
सदर स्पर्धांच्या बक्षीस वितरणासाठी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वामीनाथन राजगोपालन यांची उपस्थिती राहिली.ते स्वतः एशियन बास्केटबॉल चॅम्पियन राहिलेले आहेत. तसेच ते महाराष्ट्राचे बास्केटबॉल टीमचे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक म्हणून नऊ वेळा होते.स्वामीनाथन राजगोपालन यांना शिवछत्रपती अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे.
स्वामीनाथन रामराजगोपालन यांच्यासारख्या नावाजलेल्या इंडियन बास्केटबॉल खेळाडूची उपस्थिती लाभली.
आमदार प्रशांतदादा ठाकूर ह्यांनी नगरसेविका नेत्रा पाटील व खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण दादा पाटील ह्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.भर पावसात बास्केटबॉल सारख्या स्पर्धा घेणं आव्हानात्मक होत तरीदेखील स्पर्धा आयोजित करून ती यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल विशेष कौतुक केले. वर्षभर लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात ते नेहमीच सक्रिय असतात आणि युवा पिढीसमोर एक आदर्श ठेवतायत असेही म्हणाले.
*सदर स्पर्धेमध्ये 14 वर्षाच्या आतील मुलांच्या संघांमध्ये विजेते*
पहिलं पारितोषिक न्यू होरिझन पब्लिक स्कूल यांनी पटकावले दुसरे पारितोषिक विबग्योर स्कूल खारघर तिसरे पारितोषिक विश्वज्योत हायस्कूल खारघर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर च पारितोषिक निहार याला मिळाले तर बेस्ट शूटर म्हणून रुद्रला मिळाले.
*14 वर्षाच्या आतील मुलींच्या संघांमध्ये विजेते*
पहिलं पारितोषिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ दुसरे पारितोषिक इंडॉस्कॉट्स ग्लोबल स्कूल, कामोठे तिसरे पारितोषिक बालभारती पब्लिक स्कूल खारघर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून साक्षी व बेस्ट शूटर सिया यांना देण्यात आले
*सतरा वर्षाच्या खालील मुलांच्या संघांमध्ये विजेते*
पहिले व दुसरे पारितोषिक बालभारती पब्लिक स्कूल खारघर तिसरी पारितोषिक इंडॉस्कॉट्स ग्लोबल स्कूल मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ध्रुव व बेस्ट शूटर म्हणून अवधूत यांना गौरविण्यात आले.
*17 वर्षाच्या खालील मुलींचे विजेते संघ*
पहिली व दुसरे पारितोषिक बालभारती पब्लिक स्कूल, खारघर तिसरे पारितोषिक विश्वजीत हायस्कूल खारघर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर परिधी व बेस्ट शूटर स्नेहा यांना गौरवण्यात आले.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिलीप जाधव,आदित्य हातगे, कुणाल देवकर, दिनेश यादव, वैभव शेजवळ,रणजीत पाटील, विनोद कढरे, संदीप पाटील, नितीन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.खारघर स्पोर्ट्स अकॅडमी चे बास्केटबॉल प्रशिक्षक इम्तियाज बागलकोटे व प्रिन्स या दोघांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
सदर स्पर्धांचे सूत्रसंचालन डॉक्टर कोमल कुलकर्णी, अनुजा राऊत, सीमा सातपुते तसेच प्रेरणादायी वक्ते (मोटिवेशनल स्पीकर) नवीन खरे यांनी केले.




