घरोघरी तिरंगा - हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पनवेल पालिकेच्या सर्व शाळांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन


घरोघरी तिरंगा - हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पनवेल पालिकेच्या सर्व शाळांमध्ये  रांगोळी स्पर्धेचे आयोजन



पनवेल ,दि.१३: पनवेल महापालिकेमार्फत आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी तिरंगा- हर घर तिरंगा मोहीम 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबवली जात आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार व नियोजनानुसार पनवेल महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ठीक आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच सर्व शाळांमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. स्वातंत्र्य दिनावर आधारित  रांगोळी स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पानाफुलांचा व रांगोळीचा वापर करून रांगोळ्या काढल्या प्रत्येक शाळेतून प्रत्येक वर्गातून रांगोळी स्पर्धेतून व चित्रकला स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले .सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी सांस्कृतिक विभाग समिती ,सर्व मुख्याध्यापक ,शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image