ईशान्य फाऊंडेशनच्या सी.एस.आर.ने वळवली शाळेचे रुपडे पालटले-प्रकाश म्हात्रे
पनवेल/प्रतिनिधी,दि.२७- रायगड जिल्हा परिषद शाळेसाठी दिपक फर्टिलायझर्सच्या ईशान्य फाउंडेशनच्या सी.एस.आर निधिमधून विविध कामांचे लोकार्पण कंपनिचे एच.आर हेड मा. निरज अगरवाल यांच्या हस्ते,मा कामगार नेते श्री.प्रकाश म्हात्रे यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी वसंत विरकर,संदिप काकडे, योगेश पाटील,नगरसेविका प्रज्योती म्हात्रे,माजी सरपंच दिलीप पाटील,अनिल पालेकर,हरिश्चंद्र पेटकर,विश्वास पेटकर यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता पाटील,माजी अध्यक्ष बाळकृष्ण म्हात्रे, मारुती पाटील,कोंडिराम पालेकर,जगदिश पालेकर,डॉ.शैलेश वाजेकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्य व महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात प्राथमिक शाळा वळवलीसाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रार्थना हॉल,तीन LED TV देऊन शाळेचे डिजीटलायजेशन करण्यात आले.तसेल मागील वर्षी शाळा इमारतीचे नुतनीकरण केले.अशा विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले.या वेळी बोलतांना श्री प्रकाश म्हात्रे म्हणाले की,दिपक फर्टिलायझर्सच्या ईशान्य फाउंडेशनच्या CSR ट्रस्टमार्फत या भागात खरोखरच खुप चांगले काम सुरु आहे.काल वळवली गावासाठी प्रार्थना हॉल,डिजिटलायझेशन ऑफ स्कूल,स्कूल बिल्डींग रिनोवेशन सह अनेक महिलांना भाकरी यंत्र,टपरीधारकांना रेफ्रीजेटर असे जवळ-जवळ ५० लाख रुपयांची कामे केल्याबद्दल सर्व विश्वस्तांंचे आभार मानले.
या निमिम आयोजित नेत्र-चिकीत्सा शिबिरासाठी नागरीकांनी मोठी गर्दा केली होती.येथे १० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.१०० जणांना डोळ्यांची चिकित्सा करन मोफत चष्मे देण्यात आले.तसेच इतर अनेक जणांना सवलतीच्या दरात उपचार करून औषधे देण्यात आली.पनवेलमधील सुप्रसिद्ध अशा लक्ष्मी आय ईस्टीट्यूटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी ईशान्य कांउंडेशनने पुढाकार घेतला होता.या संपूर्ण सहकार्यामुळे वळवली शाळेचे तसेच गावाचे रूपडे पालटले असून नेहमी अशा सहकार्याची अपेक्षा कामगार नेते प्रकाश म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून केली.

