कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त परिवाराची कार्यकारिणी जाहीर
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाचगाव कदम ग्रामस्थ एकत्र आले आहेत. गावातील ग्रामस्थांच्या उद्भवणार्या समस्या शासन दरबारी सोडवण्याकरिता वेळे, करंजवडे, जांब्रुक, रोहिणे, भवानी नगर या पाचगावातील नागरिकांनी एकत्र येत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवार या संघटनेची स्थापना करून कार्यकारिणीची निवड केली.
ठाणे विश्रामगृह येथील बैठकीत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवाराच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष मुकुंद कदम (वेळे), उपाध्यक्ष संजय कदम (भवानी नगर), सचिव सदानंद कदम (जांब्रुक) वांवढळ, खजिनदार अमोल कदम (करंजवडे/भिवंडी), सहसचिव सूर्यकांत कदम (रोहिणे/आनगाव), सहखजिनदार मंदार कदम (वेळे), तसेच कार्यकारिणी सदस्यपदी सुनील कदम (वेळे), प्रमोद पवार (भवानी नगर), संतोष कदम (जांब्रुक/वावंढळ), बाळकृष्ण कदम (रोहिणे/आनगाव), अनंत कदम (रोहिणे /माणगाव), भगवान कदम (रोहिणे/माणगाव), सुभाष कदम (धरणा कॅम्प), निलेश कदम (वेळे), दिलीप कदम (रोहिणे), सल्लागारपदी धनंजय कदम (वेळे), शशिकांत कदम (वेळे), आनंद कदम (करंजवडे/भिवंडी), निलेश कदम (जांब्रुक/वावंढळ), सतीश कदम (भवानी नगर) यांची निवड करण्यात आली.