दीपक फर्टिलायझर्सचे अध्यक्ष शैलेश सी.मेहता यांची फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड
पनवेल (प्रतिनिधी) सार्वजनिक क्षेत्र, संयुक्तक्षेत्र आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असलेल्या देशातील खत उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणारी कंपनी फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय)ने दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाधन अॅग्रीटेक लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शैलेश सी. मेहता यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली.
उद्योगात चार दशकांहून अधिककाळ अनुभव असलेले श्री. मेहता यांनी पाच वर्षांहून अधिककाळ फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया (वेस्टर्न रिजियन)चे अध्यक्ष म्हणून देखील काम केले. खत उद्योगाने गेल्या दोन दशकांत भारताच्या कृषी विकास उत्पादनात ६० टक्के आणि फलोत्पादन उत्पादनात ४० टक्के वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा उद्योग जागतिक स्तरावरील सर्वोत्तम उत्पादनांमध्ये त्याच्या कार्यक्षमतेचे मापदंड स्थापित करतो आणि लाखो भारतीय शेतकऱ्यांना अनुदानित खतांचा प्रभावीपणे पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. याप्रसंगी मत व्यक्त करत श्री. मेहता म्हणाले, “अन्न टंचाई पासून जागतिक कृषी निर्यातदारापर्यंतचा भारताचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. या प्रवासात खत उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे, आता शाश्वत विकासाला पाठिंबा देणाऱ्या अधिक संतुलित आणि पोषक खतांवर लक्ष केंद्रित केले आहे. सरकार, उद्योग आणि आपल्या शेतकऱ्यांमध्ये दुआ म्हणून काम करण्याचा मला खरोखर अभिमान आहे, जेथे जागतिक स्तरावर भारतीय शेतकरी आणि शेती उत्पादकता वाढवण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेन'' असेही शैलेश मेहता यांनी या निवडीबद्दल मत व्यक्त करताना आश्वासित केले.