कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल तर्फे स्वच्छ बाजार आवार अभियान

 कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल तर्फे स्वच्छ बाजार आवार अभियान



 पनवेल : राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनेनुसार माजी आमदार दत्तूशेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल यांच्यातर्फे स्वच्छ बाजार आवार अभियान कार्यक्रम 25 एप्रिल रोजी बाजार समिती आवारात राबविण्यात आला. यावेळी येथील परिसर स्वच्छ करण्यात आला. 
         पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणाहून व्यापारी, शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. अनेक नागरिक ते खरेदी करण्यासाठी येतात. यादरम्यान भाजीपाल्याचा कचरा त्या ठिकाणी साचतो. स्वच्छ बाजार आवार अभियानाच्या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव, संचालक मंडळ यांनी हातात झाडू घेऊन येथील परिसर स्वच्छ केला. यावेळी सभापती नारायणशेठ घरत, उपसभापती सुनील सोनावळे, सचिव प्रकाश नाईक, संचालक बाळकृष्ण पाटील, सुभाष पाटील, अशोक गायकर, अर्जुन गायकर, देवेंद्र मढवी, देवेंद्र पाटील, मच्छिंद्रनाथ पाटील, महादू पाटील, सखाराम पाटील, ललिता फडके, प्रताप हातमोडे, रामचंद्र पाटील, सोमनाथ म्हात्रे, दिनेश महाडिक, अतिश पाटील, यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी उपस्थित होते. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image