पनवेलमध्ये आरोग्यकिरण हेल्थ एक्स्पो
पनवेल (प्रतिनिधी) आरोग्यकिरण व कृष्णा इव्हेंटच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील गोखले सभागृहात दिनांक ४ व ५ जानेवारी आरोग्यकिरण हेल्थ एक्स्पो २०२५ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन शनिवार दिनांक ४ जानेवारीला सायंकाळी ०५ वाजता पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते तर रविवार दिनांक ५ जानेवारीला पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपथितीत धन्वन्तरी यागचे लोकार्पण होणार आहे.
या कार्यक्रमात विविध आरोग्य आवश्यक भेसळ रहित उत्पादन व पदार्थांचे प्रदर्शन तसेच लोकांच्या उत्तम आरोग्याच्या भवितव्याकरिता राष्ट्रीय चिकित्सा सेवा रत्न २०२४ सन्मानित प्रसिद्ध वैद्य नीरज दांडेकर यांच्या मार्फत बाल आरोग्य रहस्य, कॉर्पोरेट जीवनशैली आणि आयुर्वेद व स्वयंपाकगृहाचे आरोग्य तीन व्याख्याने आयोजित करणार आली आहेत.