गुंतागुंती गर्भधारणा असलेल्या 34 वर्षीय महिलेने दिला तिळ्या बाळांना जन्म;नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रसुती - आई आणि तिन्ही बाळ सुखरुप

गुंतागुंती गर्भधारणा असलेल्या 34 वर्षीय महिलेने दिला तिळ्या बाळांना जन्म;नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रसुती - आई आणि तिन्ही बाळ सुखरुप


नवी मुंबई - गुंतागुंती गर्भधारणा असलेल्या ३४ वर्षीय महिलेने खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये तीन बाळांना जन्म दिला. यापैकी दोन मुलं आणि एक मुलगी आहे.खारघरच्या  मेडिकवर  हॉस्पिटल्स येथील डॉ. रोहिणी खेरा भट्ट( स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ), डॉ. स्वप्नील पाटील( बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ), डॉ. वृक्षल शामकुवार,( बालरोगतज्ञ) आणि डॉ. जयश्री व्यंकटेशन (भूलतज्ज्ञ), यांच्या टिमने प्रसंगावधान राखत यशस्वीरित्या या तीनही गर्भधारणेचा योग्य व्यवस्थापन केले. गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यात (३४ आठवडे) या महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली.

श्रीमती रीता कुमार (नाव बदलले आहे) या वाशी येथील रहिवासी असून आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे ही तिची पहिलीच गर्भधारणा होती आणि त्यांच्या पोटात तिन गर्भ होते. या जोडप्याने गेली कित्येक वर्षे नैसर्गिकरित्या गर्भधारणेसाठी प्रयत्न केला होता परंतु सकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत. पोटात तिन गर्भ असणे ही एक दुर्मीळ घटना असून ती गुंतागुंतीची असते आणि आईच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. या गर्भधारणेत तीन पैकी दोन बाळांना एक नाळ होती. गर्भधारणेच्या 28 व्या आठवड्यात ओटीपोटात दुखत असल्याने या रुग्णाने  मेडिकवर हॉस्पिटल्स येथील स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ रोहिणी खेरा भट्ट यांची भेट घेतली.  2 आठवड्यांपासून वेदना जाणवत होत्या असल्याने लगेचच अल्ट्रासाऊंड तपासणी करण्यात आली ज्यात असे दिसून आले की तिच्या गर्भाशयाचे मुख अतिशय लहान आहे आणि गर्भाशय मुखाला टाके असूनही त्याचे तोंड उघडू लागले आहे. ही प्रक्रिया तिच्या नवी मुंबईतील खाजगी आयव्हीएफ केंद्रात केली होती.

या प्रकरणात गर्भवती महिलेला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला तसेच विशेष औषधोपचार आणि बाळाच्या फुफ्फुसांना परिपक्व होण्यासाठी कॉर्टिकोस्टेरॉईड्स, गर्भाशयाच्या मुखाची लांबी कमी झाल्यामुळे कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके आणि आई आणि बाळ दोघांची नियमित तपासणी करून गर्भधारणा शक्य तितकी लांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही गर्भधारणा 34 आठवड्यांपर्यंत यशस्वीपणे लांबविण्यात आली. अशा तिळ्या गर्भधारणेत योग्य परिणामांकरिता सुमारे 34 आठवडे पूर्ण होणे अपेक्षित आहे. कारण यावेळी  बाळांमध्ये अकाली जन्मासंबंधी गुंतागुंत होण्याचे धोके लक्षणीयरीत्या कमी होतात. या गुंतागुंतीच्या गर्भधारणेमुळे सिझेरियन प्रसुती करण्यात आली. या महिलेने निरोगी बाळांना जन्म दिला असून यामध्ये 1.59 किलो वजनाची मुलगी आणि 1.75 किलो आणि 1.43 किलो वजनाची दोन जुळी मुले आहेत

तिन्ही बाळांच्या प्रकृतीचे निरीक्षण करण्यासाठी डॉ.स्वप्नील पाटील यांच्या देखरेखीखाली त्यांना एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यातील एका बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला 4 दिवस रेस्पीरेटरी सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तिसऱ्या दिवसापासून दोन्ही पालकांनी बाळासाठी कांगारू मदर केअर सुरू केले. बाळांना 2 आठवड्यांनंतर घरी सोडण्यात आले. यावेळी तिन्ही बाळांची प्रकृती स्थिर असल्याची खात्री करण्यात आली आणि विशेषत: त्यांच्या स्तनपानास सुरुवात केल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले. अर्भकांच्या वाढ आणि त्यांच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित बालरोग तज्ज्ञांकडे फॉलोअप घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता बाळांची प्रकृती उत्तम आहे.

जवळचे निरीक्षण, वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप आणि सहाय्यक काळजी, आई आणि तिच्या तिघांना सकारात्मक परिणाम मिळाला. “मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये, क्लिष्ट तिहेरी प्रसूती हाताळण्यासाठी उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान मातृत्वाच्या काळजीमध्ये एक नवीन मानक सेट करते. या मौल्यवान आनंदाच्या बंडलचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी कुशल संघ परिपूर्ण सामंजस्याने कार्य करतो. अत्याधुनिक देखरेख प्रणालींपासून ते विशेष नवजात अतिदक्षता युनिट्स (NICUs) पर्यंत, प्रत्येक पैलू मातांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केलेले आहेत. अशा यशस्वी तिहेरी प्रसूतीसह,  मेडिकवर हॉस्पिटलने हे सिद्ध केले आहे की आधुनिक तंत्रज्ञानासह विलक्षण काळजी खरोखरच चमत्कार घडवू शकते,” डॉ. रोहिणी खेरा भट्ट म्हणाल्या.

गुंतागुतीची गर्भधारणा असूनही यशस्वीरित्या तिन्ही बाळांना जन्म दिल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला. आमचे स्वप्न साकार करणाऱ्या मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमचे आम्ही विशेष आभार मानतो. आमची तिन्ही बाळं निरोगी आहेत आणि त्यांच्या वयानुसार ते त्यांच्या विकासाचे टप्पे गाठत असल्याची प्रतिक्रिया वडील रवींद्र कुमार (नाव बदलले आहे) यांनी व्यक्त केली.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image