राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून रा.जि.प.शाळा दादरपाडा येथे देण्यात आला स्मार्ट टिव्ही संच !

राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून रा.जि.प.शाळा दादरपाडा येथे  देण्यात आला स्मार्ट टिव्ही संच !




उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक,कला,क्रीडा आणि शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून अनेक गरीब - गरजूवंतानां आणि आदिवासीं विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात पुढे करत तब्बल ४६ आदिवासीं विद्यार्थ्याचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या संपूर्ण  शिक्षणाचा  खर्च उचलून आज त्याच आदिवासीं विद्यार्थ्या मधून काही विद्यार्थी चांगल्या हुद्यावर नोकरी धंद्यावर रुजू होऊन उज्वल भविष्याच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत.अश्या अनेक शालेय विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य घडविणारे  दानशूर व्यक्तिमत्व राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून आज एक आदर्शवत कार्य साकारलं गेलं ते म्हणजे रा.जि.प.प्राथमिक शाळा दादरपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणातील ऑनलाईन अभ्यासक्रमात उपयोगी येणारे आणि शालेय अध्यापनातीत ई - लर्निग कामकाजा करिता अती आवश्यक असणाऱ्या कामकाजा करिता लागणारां टिव्ही संच ( स्मार्ट टिव्ही )देण्याचे औदार्य सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांनी दाखवत एक आदर्श निर्माण केला आहे.राजू मुंबईकर यांच्या या कार्याबद्दल रा.जि.प.प्राथमिक शाळा दादरपाडाच्या सर्व शिक्षक वर्गा कडून राजू मुंबईकर यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले.
 

 केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर,माजी उपसरपंच संदेश कोळी,कॉन वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेंद्रदादा पाटील,आणि रा.जि.प.शाळा दादरपाडाचे मुख्याध्यापक  चंद्रकांत गावंड, आवरे गावचे आदर्श शिक्षक रविंद्र पाटील आणि सर्व विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.