कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मायदेशात जंगी स्वागत!

 कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मायदेशात जंगी स्वागत!



उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक )चे राष्ट्रीय सचिव तथा NMGKS संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते यांची दिनांक २१ मार्च २०२४ रोजी लंडन येथे झालेल्या निवडणुकीत ITF या बहुराष्ट्रीय संघाच्या लॉजिस्टिक व वेअरहौसिंग विभागाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली.महेंद्रजी घरत हे ITF परिषद संपवून आज दिनांक २३ मार्च २०२४ रोजी लंडनहून आपल्या मायदेशी परतले. शेलघर येथे त्यांचे सहकारी, मित्र, कामगार व घरत परिवारातील सदस्यांनी त्यांचे ढोलताश्यांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतशबाजीत जंगी स्वागत केले.१४० देश सदस्य असलेल्या ITF या बहुराष्ट्रीय संघाच्या उपाध्यक्ष पदापर्यंत आगरी समाजातील कामगार नेता भरारी घेतोय ही समाजासाठी तसेच भारतीय कामगार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. महेंद्रशेठ घरत या पदापर्यंत पोहोचण्याचे सर्व श्रेय प्रामाणिक पणे त्यांच्यासोबत असणाऱ्या कामगारांना व त्यांच्या सहकार्याना देतात हे त्यांचा मोठेपणा आहे. कामगार, सहकारी व परिवाराकडून झालेल्या जंगी स्वागताने महेंद्रशेठ घरत भारावून गेले व या पदामुळे माझी कामगार क्षेत्रातील जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image