पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट च्या वतीने निवारा नसलेल्याना ब्लॅंकेट वाटप

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व प्रल्हादराय  झुलेलाल  ट्रस्ट च्या वतीने निवारा नसलेल्याना ब्लॅंकेट वाटप


पनवेल /प्रतिनिधी

सध्या थंडी ची लाट येऊ लागली आहे ,ज्यांना निवारा नाही असे बेघर नागरिक रस्त्यावर झोपताना तंडीत कुडकुडकत असतात अशा गरजू गरीब नागरिकांना   पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे  आणि श्री प्रल्हादराय  झुलेलाल  ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड  मनोहर सचदेव  यांच्या संकल्पनेतून  कामोठे स्टॉप ,खांदेश्वर रेल्वे स्थानक ,पनवेल बस डेपो समोरील रस्त्यावर .फुटपाथ वर झोपणाऱ्या गोर गरीब नागरिकांना मोट ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले . पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि श्री प्रल्हादराय झुलेला ट्रस्ट विविध सामाजिक उपक्रम वराशबाहेर राबवत असते त्यातील हा उपक्रम गेली पाच वर्षे सातत्याने थंडीच्या काळात  आयोजिला जातो

यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती चे अध्यक्ष निलेश सोनावणे ,उपाध्यक्ष गौरव जहागीरदार ,सचिव शंकर वायदंडे ,सहसचिव  तुळशीराम बोरीले ,संघटक रवींद्र गायकवाड  उपस्थित होते.