इर्शाळवाडी दरडग्रस्त जखमींची माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट.

इर्शाळवाडी दरडग्रस्त जखमींची माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट.



उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या खालापूर तालुक्यातील चौक विभागात असणाऱ्या व इर्शाळगडाच्या डोंगरावर वसलेल्या इर्शाळवाडी येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे, या दुर्घटनेत आतापर्यंत 29 ग्रामस्थ हे मृत्युमुखी पडले आहेत तर शेकडो ग्रामस्थ हे जखमी झाले आहेत. दिनाकं 22 जुलै 2023 रोजी इर्शाळवाडी दरडग्रस्त जखमींची या उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख  मनोहरशेठ भोईर यांनी एमजीएम पनवेल हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व अस्तेने विचारपूस केली तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शब्द दिला आहे.

सदर वेळी त्यांच्या सोबत पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, चौक जिल्हा परिषद सदस्य  मोतीराम ठोंबरे, उपसभापती  श्यामभाई साळवी, युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी  अवचित राऊत, उपतालुका संघटक  के एम घरत, युवानेते सचिन एकनाथ मते व पदाधिकारी हेही त्यांच्यासोबत होते.
Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image