युवा वॉरियर्स फुटबॉल, व्हॉलीबॉल चषक स्पर्धा रंगली
पनवेल(प्रतिनिधी) महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी खारघर येथील गोखले शाळेच्या मैदानात रंगलेल्या युवा वॉरियर्स व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते, तर खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या युवा वॉरियर्स फुटबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) झाले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी फुटबॉल स्पर्धेला भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले.