स्वर्गीय बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्या स्मृतीस रायगड कॉंग्रेसतर्फे अभिवादन

 

स्वर्गीय बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्या स्मृतीस रायगड कॉंग्रेसतर्फे अभिवादन


            कोकणचे भाग्यविधाते, रायगडचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीमाजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्या २ डिसेंबर रोजी स्मृतिदिनानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत उलवे येथील कार्यालयात अंतुले साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

           याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले की, अंतुले साहेबांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. साहेबांची निर्णयक्षमतादूरदृष्टीपणा व प्रशासनावरील पकड, महाराष्ट्राला कायम लक्षात राहील. आज जो काही कोकणचा विकास झाला आहे तो फक्त अंतुले साहेबांमुळेच.

            अंतुले साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी लोकनेते. दि. बा पाटील साहेब यांचे सुपुत्र. श्री अतुल पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती. श्री. वसंत काठावलेपनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नंदराज मुंगाजीके. डी कोळीअरुण कोळी, अश्विन नाईकभरत गायकवाड, रुकेश काठावले व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image