श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या संस्थेच्या 'तुंबई' या नाटकाला तृतीय पारितोषिक

 श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या संस्थेच्या 'तुंबई' या नाटकाला तृतीय पारितोषिक

६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या संस्थेच्या 'तुंबई' या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले असून नुकताच सदरचा पारितोषिक समारंभ मुंबईत पार पडला. या यशाबद्दल श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मंडळाचे सचिव परेश ठाकूर यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे  आदी उपस्थित होते.